बेळगाव : बुडा आयुक्त शकील अहमद यांची बदली झाली असून त्यांच्या नूतन जागी बुडा आयुक्त म्हणून हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून बुडा आयुक्त म्हणून शकील अहमद कार्यरत होते. मात्र, राज्य सरकारने त्यांची नुकतीच बदली केली असून त्यांच्या जागी नूतन बुडा आयुक्त म्हणून डॉ. रुद्रेश घाळी यांची वर्णी लागली आहे. डॉ. रुद्रेश घाळी यांनी यापूर्वी बेळगाव महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना बेळगावची चांगली माहिती आहे