सीईटीसाठी अर्ज भरणा करणे, ऑप्शन, जागा वाटप यासह प्रत्येक टप्यातील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जलद व परिणामकारकपणे पोहोचविण्यासाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने ‘केईए विकसन’ नावाने युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्न यांनी चॅनेलचा प्रारंभ करून माहिती दिली.
सीईटी प्रक्रियेची पूर्ण माहिती
विद्यार्थ्यांना पोहोचविण्याचे काम केईए करणार आहे. ही माहिती केवळ सीईटीसाठीच मर्यादित असेल. नेमणूक प्रक्रियेसंदर्भातही चॅनेलवर माहिती प्रसारण करण्याचे प्रयत्न आहेत. एक्स-ट्विटर (@ KEA_Karnataka) सुरू केल्यानंतर ३३ हजार फॉलोअर्स मिळाले आहेत.