बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभागआणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव बुधवार दि. १९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मालार्पण करण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच विशेष निमंत्रित म्हणून अशोक पट्टण, प्रकाश हुक्केरी, भरमगौडा कागे, महांतेश कौजलगी उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार प्रियांका जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार दिलीपकुमार कुरुंदवाडे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच अंजली पाटील व साहिल चव्हाण हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
जिल्हा प्रशासनातर्फे उद्या शिवजयंतीचे आयोजन
By Akshata Naik

Previous articleबेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना