बेळगाव : केएलई स्कूल ऑफ म्युझिकचा
वर्धापनदिन व दिवंगत पं. हयवदन जोशी यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि. १९ रोजी दुपारी ४.३० वाजता संस्थेच्या संगीत महाविद्यालयात ‘स्वर श्रद्धांजली’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी आकाशवाणी धारवाडचे ए ग्रेडचे कलाकार पं. सदाशिव ऐहोळे यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय तसेच सुगम संगीत होणार आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे प्राचार्यका राजाराम अंबडेकर यांनी कळविले आहे