No menu items!
Friday, August 29, 2025

दिल्लीच्या तख्तावर बेळगावच्या मराठी कवींचा बुलंद हुंकार!

Must read

मराठी अस्मिता, सीमाभागाचा संघर्ष आणि व्यथांचे प्रभावी सादरीकरण

नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती संभाजी महाराज विचारपीठावर मराठी अस्मितेचा बुलंद आवाज घुमला! या भव्य काव्यमैफिलीत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरातमधील २०० हून अधिक कवींनी सहभाग घेतला. विशेषतः बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकी या सीमाभागातील मराठी कवींनी आपल्या जळजळीत काव्यरचनांमधून सीमाभागातील व्यथा, वेदना आणि संघर्षाचे प्रभावी दर्शन घडवले.

मराठी अस्मितेचा दिल्लीत जागर

संमेलनाचे संयोजक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरद गोरे होते. सीमाप्रश्न आणि मराठी अस्मितेवर केंद्रित कविता विशेष गाजल्या. “दिल्लीच्या तख्तावर सीमावासीयांच्या वेदनांचे प्रतिबिंब उमटणाऱ्या ओजस्वी काव्यरचनांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.”

सीमाभागाचा हुंकार : बेळगावच्या कवींचा प्रभावी आवाज

संमेलनात बेळगावचे प्रसिद्ध सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या प्रभावी कवितांद्वारे सीमावासीयांच्या वेदना मांडल्या. त्यांच्या “माय” आणि “झुंज” व ‘सिमेची घुसमट ‘या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले.

“माय” – सीमाभागातील दुःखाचा हुंकार

“सीमेपलीकडून हाका मारी,
दुःखाने भरलेली माय,
मराठी असली महाराष्ट्राचीच,
तरीही दुरावली का?”

ही कविता सीमावासीयांच्या वेदनांना वाचा फोडणारी ठरली.

“झुंज” – मराठी अस्मितेची लढाई

*”जय महाराष्ट्र”चा नारा,
इथे जिवाशी येतो!
मराठी माणूस इथे,
आजही बंधनात जगतो!

तख्त दिल्लीचं झळाळत आहे, पण माय गल्लीत रडते!
मराठीच्या लेकरांना इथे, दडपशाही झेलावी लागते!”*

या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

संमेलनात गाजलेल्या अन्य प्रभावी कविता

“मराठी अस्मितेचा जागर” – प्रतिभा सडेकर (बेळगाव)
“आमची मागणी दिल्ली दरबारी, त्रासली जनता अन्याय दूर करी!
अन्यायाविरुद्ध टाहो फोडतो आता, आमुचा जीव गुदमरतो,
महाराष्ट्रात येण्या अधीर होतो!”

“मी सह्याद्री बोलतो आहे” – शीतल पाटील (बेळगाव)
“मी सह्याद्री बोलतो आहे, खुणा इतिहासाच्या जपतो आहे!
निधड्या छातीच्या छाव्याची कथा, तुम्हास सांगतो आहे!”
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम या कवितेतून साकारला.

“सीमाभागावरील मराठी बाणा” – व्यं. कृ. पाटील (खानापूर, बेळगाव)
मराठी अस्मिता आणि सीमासंघर्षावर भाष्य करणारी कविता.
का? उत्तर मिळेल का?” – प्रा. मनिषा नाडगौडा (बेळगाव)
निर्भया, श्रद्धा प्रकरणावर भाष्य करणारी स्त्रीसुरक्षेचा गंभीर प्रश्न मांडणारी रचना.

“अव्यक्त निराकार” – डॉ. संजीवनी खंडागळे (बेळगाव) ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारी ही कविता मनाला विचार करण्यास भाग पाडणारी ठरली.

“प्रयत्नार्थी परमेश्वर” – अस्मिता आळतेकर (बेळगाव) मराठी म्हणींवर आधारित या कवितेत विस्मृतीत गेलेल्या म्हणींचा जागर घालण्यात आला. दुरूनी डोंगर साजरे दिसती .

“कालिकारुपी” – रोशनी हुंद्रे (बेळगाव)
मणिपूरमधील महिलांवरील अमानुष अत्याचारांवर भाष्य करणारी कविता.
“स्वतः रौद्र रूप धारण केले पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे!”

“मुलीला जन्म देणे असतो का गुन्हा?” – सुवर्णा हणमंत पाटील (बेळगाव)
मुलींच्या जन्मावरून समाजात असलेली दुजाभावाची मानसिकता अधोरेखित करणारी कविता.

“सावित्रीबाई फुले” – अपर्णा पाटील (बेळगाव)
स्त्री शिक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक संघर्ष अधोरेखित करणारी कविता.

“जाती असच हे दिसं” – पूजा राजाराम सुतार (बेळगाव)
नवऱ्याने सोडून दिलेल्या स्त्रीच्या व्यथेला वाचा फोडणारी कविता.

मानसी पाटील हिने “मराठीचा गौरव ” काव्यरचना मांडली

यावेळी संमेलनास खासदार सुप्रिया सुळे, IAS अधिकारी रोहिणी भाजीभाकरे, संमेलन संयोजक अध्यक्ष संजय नहार, रवींद्र पाटील, नागटिळक, रमेश रेडेकर व अमोल कुंभार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

सीमाभागातील मराठी अस्मितेचा नवा इतिहास!
Sया संमेलनाच्या निमित्ताने सीमाभागातील मराठी अस्मिता, मराठी भाषेचा बुलंद आवाज आणि सीमाप्रश्नावरील संघर्षाचा हुंकार दिल्लीच्या तख्तावर घुमला. बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!