बेळगाव जिल्ह्यातील कुडची शहरातील भारत मेडिकलशॉपमध्ये आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. डोकेदुखीच्या गोळ्या मागितलेल्या ग्राहकाला मेडिकल दुकानदाराने चुकून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, आणि ही गोष्ट समजताच परिसरात मोठा गोंधळ उडाला.
ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी मेडिकल दुकानदाराला धारेवर धरले, त्याला अपशब्द सुनावले व काहींनी तर त्याची कानउघाडणी केली.
स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या दुकानाचा परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.
डोकेदुखीच्या गोळ्या मागितलेल्या ग्राहकाला मेडिकल दुकानदाराने चुकूनदिल्या गर्भपाताच्या गोळ्या
