दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावातील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ज्योतिर्लिंग देवस्थानातील प्रयागराज ला गेलेले भक्त यांनी येताना तेथून गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम गोदावरी ,अयोध्या, काशी येथील तीर्थ आणले होते. त्या तीर्थाचे मंदिरात गंगापूजन करून जोतिबा देवाला आणि महाकालेश्वरला जलाअभिषेक करण्यात आला त्यानंतर ब्रह्म मुहूर्तावर लघु रुद्राभिषेक करून महाकालेश्वर ची मंदिरात आकर्षक डोळ्याची पारणे फेडणारी अशी महाकालेश्वर ची प्रतिकृती साकारण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. जोतिबा मंदिरा साकारण्यात आलेली महाकालेश्वर ची प्रतिकृती ही सर्व भक्तांना पाहण्यासाठी खुली आहे. त्यामुळे सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
महाशिवरात्री निमित्त ज्योतिबा मंदिरात यंदा विशेष महाकालेश्वरची पूजा
By Akshata Naik

Previous articleमराठी माणसांना त्रास झाला तर आमच्या भाषेत उत्तर देऊ