महाराष्ट्र एकीकरण युवा समिति सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सहकाऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यात आली
बाळेकुंद्री येथे अल्पवयीन मुलीला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाला भाषिक रंग देऊन सीमाभागात वातावरण खराब करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या दबावाखाली येऊन. उलट मराठी माणसांवर खोटे गुन्हे घातले जात आहेत. त्या संघटनांचा म्होरक्या बेंगलोर वरून बेळगावला येऊन इथल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्रातल्या पक्ष-संघटनांना आवाहन देण्यात आले . आणि पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींची कल्पना त्यांना दिली. ह्या विषयी बोलताना कर्नाटक सरकार सोबत मी स्वतः बोलेन असे उद्धव साहेबानी सांगितले. तसेच जर मराठी माणसाला त्रास देणं थांबलं नाही तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि स्वतः बेळगावला येऊन त्यांना उत्तर देईन असे खासदार संजय राऊत म्हणाले.
मराठी माणसांना त्रास झाला तर आमच्या भाषेत उत्तर देऊ
