दर वर्षा प्रमाणे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा मंदिर, खानापूर रोड बेळगाव येथे मराठी भाषा गौरव दिवस, भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा, व इयत्ता १० वित यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री आकाश शंकर चौगुले(IRS) अप्पर आयुक्त GST, बेळगाव, हे मातृभाषेतून शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअरच्या संधी याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत
उद्या मराठी भाषा गौरव दिवस, भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा
