हिंडलगा ग्रामस्थांचे कारागृहासमोर रास्तारोको करून आंदोलन केले आणि
कारागृह प्रशासना विरोधात करत संताप व्यक्त केला झाले असे की
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसविलेल्या मोबाईल जॅमरमुळे सर्व मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. जॅमरच्या तीव्रतेमुळे कारागृहाच्या आजूबाजूला ३ ते ४ कि. मी. पर्यंत नेटवर्क मिळत नसल्याने हिंडलगा परिसरातील ,सुळगा आंबेवाडी, मण्णूर, बेनकनहळ्ळी, गणेशपूर भागात देखील याचा परिणाम झाल्याने नागरिक व मोबाईलधारक हैराण झाले आहेत.याचा
आसपासच्या जनजीवनावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे जॅमरची तीव्रता कमी करावी अशी वारंवार मागणी करून देखील कारागृह व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ कारागृहासमोर मुख्य रस्त्यावर सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
कारागृहासमोर रास्तारोको करून हिंडलगा ग्रामस्थांनी केले आंदोलन
