रजपूत बंधू माध्यमिक शाळा, टिळकवाडी बेळगाव चे 2024- 25 व्या वर्षाच्या SSLC विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि.7-3-2025 शुक्रवार रोजी श्रीमती मालतीबाई साळुंखे शाळा, सुभाष मैदान येथील सभागृहात मोठ्या थाटात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ZRUCC चे सदस्य श्री.प्रसाद कुलकर्णी ,भाजप नेते श्री. वसंत हेब्बाळकर, टिळकवाडी क्लस्टरच्या मास रिसोर्स ऑफिसर सौ.वंदना बर्गे, उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री.दया हिशोबकर, ज्येष्ठ अधिवक्ता श्री.रवी इंचल,मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री.रामकृष्ण तेंडोल कर,श्री.रामनाथ नायक,श्री. सुनिल नाडगौडा व शिक्षक श्री. बसनगौडा पर्वत गौडा होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.श्री. रवी इंचल, श्री. रामकृष्ण तेंडोलकर, सौ.वंदना बर्गे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडू माकणावर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. श्री. बसवराज हुनश्याला यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीमती श्रीदेवी मुगलीहाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री.विनायक गजकोश यांनी आभार प्रदर्शन केले.अल्पोपहारने कार्यक्रमाची सांगता झाली.