उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला चाहूल लागते ती हापूस आंब्याची. सध्या बेळगावात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. येथील फळ मार्केट मध्ये एम बी देसाई अँड सन्स यांच्या दुकानात हापूस आंब्याचा लिलाव करून विक्री करण्यात येत आहे. हापूसचा दोन हजार ते चार हजार रुपये प्रति डझन असा दर आहे.
आंब्यामध्ये अनेक प्रकार आहेत मात्र हापूस आंब्याची चव काही वेगळीच असल्याने ग्राहक हापूसची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. सध्या बेळगावात हापूस आंबा दाखल झाला असून आवक देखील वाढली आहे. त्यामुळे रसरशीत आंब्याची चव चाखण्याकरिता मिळेल त्या भावात ग्राहक हापूस आंब्याची खरेदी करत आहेत.
रसाळ आणि मधुर ची ही हापूस आंब्याची चव असल्याने त्याचा गोडवा चाखण्याकरिता ग्राहक मिळेल त्या भावात आणि चढ्या दराने लिलावात बोली लावून हापूस ची खरेदी करत असल्याचे यावेळी फळ मार्केट मध्ये दिसून आले