सिद्धार्थ बोर्डिंग येथे सिद्धार्थ बोर्डिंग आणि जीवन संघर्ष फाउंडेशन तसेच मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने बाल केसरी विजेता गगन पूजनगौडा तसेच विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या स्वरांजली ईश्वर बांडगी यांना विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी जीवन संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला.
याप्रसंगी देहदान संकल्प ठेवण्यात आला होता .यामध्ये विजया मोहिते, विमलताई मुचंडी यांनी देहदानाचा निर्णय घेतला शिवाय यांच्या या निर्णया बद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले तसेच स्वतः देहदानाचा संकल्प केला याप्रसंगी संतोष ओंगल हिरालाल चव्हाण मारुती घाडी डॉक्टर संजय कांबळे डॉक्टर विष्णू कांबळे पवित्र हिरेमठ हे उपस्थित होते