गुढीपाडव्यानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन च्या वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री शिवाजी अण्णा कागणीकर. प्रमुख पाहुणे एडवोकेट एनटी लातूर कायदे सल्लागार. डॉक्टर देवेगौडा डॉक्टर गणपत पाटील एडवोकेट यशवंत लमानी उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या वेगवेगळ्या समस्या वर चर्चा करण्यात आली.
या ठिकाणी कामगारांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व सल्ला देण्यात.
कामगार आणि कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे योजनांचा कसा लाभ घ्यावा. आपल्या भागातील कामगारांनी योजनांकडे दुर्लक्ष न करता त्याचा योग्य वेळेत लाभ घ्यावा. प्रत्येक कामगारांनी सातत्याने काम करत राहिले पाहिजे. त्याच कामगारांना सरकारी योजनांचा लाभ होईल असे मार्गदर्शन डॉक्टर शिवाजी अण्णा कागणीकर यांनी व्यक्त केले.
कायदे सल्लागार एन आर लातूर सरांनी कामगार कार्ड चे महत्व सांगून दिले त्यामधून योजनांचा लाभ कसा घेता येईल व ते नित्य नियमाने कार्ड ऍक्टिव्हेट ठेवणे गरजेचे आहे हे सांगून दिले.
श्री ऑर्थो अँड्रॉमा सेंटरचे डॉक्टर देवेगौडा यांनी वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय योजना जसे की यशस्वीनी स्कीम, इ एस आय स्कीम. बद्दल माहिती सांगितली.
आजच्या या धडपडीच्या जीवनामध्ये कामगारांच्या अनेक समस्यांमध्ये भर पडली आहे प्रामुख्याने व्यसनाधीनता, घरगुती भांडणे, व्यवस्थित वेतन न मिळणे नित्यनियमाने काम न मिळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी कामाचे नियंत्रण कसे ठेवावे. याबाबत डॉक्टर गणपत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
बेळगावात पार पडला कामगार मेळावा
