No menu items!
Wednesday, April 2, 2025

मराठा मंडळ व साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर येथील स्पोर्ट्स ट्रॅकवर प्रशिक्षण शिबिराला सुरवात

Must read

बेळगाव मधील प्रसिध्द शिक्षण संस्था मराठा मंडळ खानापुर तालुका व साई स्पोर्ट्स तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन स्केटिंग रिंक व क्रिकेट आणि फुटबॉल टर्फ ग्राउंड,टेबल टेनिस व घोडेस्वार च्या प्रशिक्षण शिबिराला सुरवात करण्यात आले.मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गर्शनाखाली खानापूर तालुक्यातील गोर गरीब व होतकरू व इतर सर्वांना या खेळांचा उपयोग व्हावा म्हणून या सर्व ग्राउंडची निर्मिती कऱण्यात आली आहे.या प्रशिक्षण शिबिराचे उद्घघाटन माजी आमदार श्री अरविंद पाटील,श्री अविनाश पोतदार व युवा नेते किरण जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सर्व खेळाडूना मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यानी खेळामध्ये सहभाग घेऊन फिट राहून उत्तम आरोग्यसाठी आणि आपले भविष्य उज्वल करण्यासाठीं शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अविनाश पोतदार यांनी सर्व ग्राउंडची प्रशंसा करून खानापुर तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराला जमलेल्या लोकांना केले व मराठा मंडळ व साई स्पोर्ट्स चे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार संजय पाटील मराठा मंडळ च्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू , उमेश कलघटगी अशोक गोरे, अंनत वाझ, सावीओ परेरा,पंडित ओगले,सुधीर हलगेकर, संयोगिता हलगेकर, युवा नेते जयराज हलगेकर,जयंत जाधव,संदीप जाधव,साई स्पोर्ट्स चे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, सुर्यकांत हिंडलगेकर, खानापुर तालुक्यातील मान्यवर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी स्केटिंग, क्रिकेट व फुटबॉल,घोडेस्वार चे प्रशिक्षक ,संजय ढवळे,तेजस पवार , ऋषीकेश पसारे,या सर्वाचा पुष्गुच्छ देवून गौरविण्यात आले यावेळी बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स,पालक व मराठा मंडळ व साई स्पोर्ट्स चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!