धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्त बेळगाव वात संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली .तसेच ते पकडल्या गेल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांना ज्या प्रकाराच्या यातना दिल्या त्याच्या आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्तान च्या वतीने बेळगाव मध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या महिनाभर धर्मवीर बलिदान महासंपाळण्यात आला आणि या बलिदान मासाची आज बेळगावातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिपद पूजन करण्यात आले त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते झालेला मुखपद यात्रेला सुरुवात झाली ही मूक पदयात्रा एसपीएम रोड शनी मंदिर हेमूकलानी चौक येथून निघून रामलिंग खिंड गल्ली श्री शंभुरातीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराजांच्या प्रतीकात्मक चिता असून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी श्री छत्रे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. तसेच विधीवत मंत्रा अग्नी देऊन त्यांच्या प्रतिकात्मक चितेचे दहन करण्यात आले याप्रसंगी वक्ते म्हणून लाभलेले कवलापूर प्रमुख श्री सुनील बापू लाड यांनी उपस्थित त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ची माहिती सांगून सर्वांना भारावून सोडले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथी निमित्त संभाजी महाराजांना श्रद्धांजली
By Akshata Naik
