जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो सेंटर यांच्यावतीने उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मुद्दे आरोग्य आणि सुरक्षितता आरोग्य तपासणी आणि बीएमडी स्कॅन चाचणी मानसिक आरोग्य समुपदेशन कायदेशीर सल्ले सपोर्ट सर्विसेस तसेच कामगारांबद्दल ठळक मुद्दे यावर कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवाजी अण्णा कागणीकर तसेच जीवन संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणपत पाटील आणि मोटिवेशनल स्पीकर्स ग्रुप ऑफ कंपनीचे नितीन सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. तसेच कामगार कायदेशीर सल्लागार एडवोकेट एन आर लातूर आणि एडवोकेट यशवंत लमाणी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रम हा उद्या 30 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे पार पडणार आहे तरी कामगारांनी आणि नागरिकांनी या कामगार मेळाव्याला उपस्थित राहून सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.