No menu items!
Wednesday, June 4, 2025

डिजिटल फसवणुकीला बळी पडल्याने वृद्ध दांपत्याची आत्महत्या

Must read

डिजिटल फसवणूकीला बेळगावातील खानापूर तालुक्यातील बीडी येथील वृद्ध जोडपे बळी पडल्याची घटना घडली असून त्यांनी डिजिटल फसवणुकीमुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
वृद्ध पतीने आपल्या पत्नीला विष देऊन त्यानंतर चाकूने स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र हा त्यांचा प्रयत्न फसला असल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली आहे खानापुरातील ख्रिश्चन वृद्ध दाम्पत्य डायगो नाजरेथ वय 83 आणि त्यांची पत्नी फ्लेविया नाझरेथ अशी आत्महत्या केलेल्या वृद्ध दांपत्यांची नावे आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या दांपत्याने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये त्यांनी महिन्यापासून दिल्लीतील बीएसएनएलचा उच्च पदस्थ अधिकारी आपल्याला धमकी देत आहे. सिम कार्डचा गैरवापर केल्याबद्दल तुम्हाला डिजिटल अटक केली जात आहे. याप्रकरणी धमकी त्यांना वारंवार देण्यात येत होती व वरचेवर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत त्यांच्याकडून पाच ते सहा लाख रुपये संबंधितांनी लाटले आहेत त्यामुळे वरचेवर होणाऱ्या त्रासाला कंटाळून दोघा पती-पत्नीने आत्महत्या करत असल्याचे या सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल एक वेळा आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. मृत डायगो हे मंत्रालय ( सचिवालय) महाराष्ट्र सरकार मधून निवृत्त झाले आहेत

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!