बेळगाव महानगरपालिकेच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत २४ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या
बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविण्यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सदर बैठकीला उपस्थित रहावे, अशी नोटीस कौन्सिल विभागाच्यावतीने बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य आणि अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली आहे.