बस मध्येच गळफास घेत चालकाने आत्महत्या करण्याची घटना बेळगाव शहरातील दुसऱ्या बस डेपो मध्ये घडली आहे.
भालचंद्र एस तुकोजी वय 45 रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी डेपो मॅनेजरकडे रजेसाठी अर्ज केलेल्या बस चालकाने चालकाला रजा नाकारण्यात आल्यामुळे सीबीटी शहापूर नाका-वडगाव बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका ट्रान्सपोर्ट मेकॅनिकने आत्महत्या केली. आता, रजा न मिळाल्याने वाहतूक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
केएसआरटीसी चालकाने रजा मंजूर न झाल्याने बसमध्ये केली गळफास घेऊन आत्महत्या
