गोवंश टिकावा आणि वाढत जावा यासाठी बेळगावातील मुचंडी गावातील शेतकरी पैलवान अतुल शिरोळे यांनी आपल्या गायीचे 7 महिन्याचे डोहाळ जेवण कार्यक्रम साजरा केला.
मुचंडी येथील पैलवान अतुल शिरोले यांच्या कल्याणी या खिल्लार जातीच्या गायीच्या ओटीभरणी आणि सातव्या महिन्यात डोहाळे जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शिरोले कुटुंबीयांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने या गायीची आरती ओवाळून साडी चोळीने तिची ओटी भरत मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला. यावेळी गायीला फळे, गोडपदार्थ व विविध गोखाद्य देण्यात आले.
गायीची ओटी भरून आरती करून डोहाळ जेवण साजरा
