श्री राम सेना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक करण्याऱ्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आणि बेळगाव शहरात गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना आज दुपारी घडली.
बेळगावातील राणी चेन्नम्मा सर्कलच्या सिग्नलवर बोलेरो टेम्पो वाहन थांबवण्यात आले. याच्या वासावरून संशयास्पद असून त्याला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात गोमांस असल्याचे आढळून आले. ही बाब तातडीने एपीएमसी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. चालकाकडे चौकशी केली असता छावणीतून गोमांस दुसऱ्या ठिकाणी नेले जात असल्याची माहिती मिळाली. सरकारने गोहत्येविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री राम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांनी केली.
यावेळी श्री राम सेना आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सध्या एपीएमसी पोलिसांनी चालक आणि वाहन ताब्यात घेतले आहे.
शहरात गोमांस वाहतूक करणाऱ्या चालकास अटक
