महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, त्यांचे बंधू व आमदार चन्नराज
संशयित मधुकर सोमवंशी हट्टीहोळी यांच्या
वाहनाला तीन महिन्यांपूर्वी अंबडगट्टीजवळ अपघात झाला होता. अचानक वाहन समोर आणून या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मधुकर कोंडीराम सोमवंशी (वय ६५, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे.
मंत्री हेब्बाळकर व आमदार हट्टीहोळी १४ जानेवारी २०२५ रोजी बंगळूरहून बेळगावला परतत होते. यावेळी कित्तूर ठाणा हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील अंबडगट्टीत त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता .