बेळगावमधील मजगाव गावाच्या उपनगरात रात्री मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी मेंढपाळाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
आनंद कडोलकर (वय 26) याच्यावर सहा जणांच्या टोळीने हल्ला केला. मजगावमधील या मेंढपाळाकडे 500 पेक्षा जास्त मेंढ्या आहेत. मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या या टोळीने मालकावरच हल्ला करून नंतर पळ काढला.
या हल्ल्यात आनंद यांच्या डोळ्याला, छातीत आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.
मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा मेंढपाळावर हल्ला
