दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे धर्मवीर संभाजी चौकाजवळ घडली. उल्हास रवी पाटील (वय २४, रा. कंग्राळी खुर्द) असे मृत तरुणाचेनाव आहे. सदर तरुण गावी गेला होता. तेथून सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास दुचाकीवरुन घरी निघाला होता. धर्मवीर संभाजी चौकाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकावर आदळली. तो खाली पडल्याने
डोकीला गंभीर दुखापत झाली. त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे घोषित केले.
दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार
