बेळगाव किल्ला शासकीय विश्रांतीगृह येथे कर्नाटक मराठा समाजाचे प्रमुख नेते व विधान परिषद चे आमदार एम. जी. मुळे साहेब यांची समिती नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली .आणि होदेगिरी येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी विषयी चर्चा केली.याप्रसंगी बेळगाव येथील प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. सरजू काटकर उपस्थित होते. नुकताच त्यांनी लिहिलेले व प्रकाशन झालेल्या ” दि ग्रेट मराठा शिवाजी” पुस्तक श्री मुळे व बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सकल मराठा पदाधिकारी विनय कदम,लक्ष्मण किल्लेकर उपस्थित होते.
कर्नाटक मराठा समाजाचे प्रमुख नेते यांची घेतली सदिच्छा भेट
