महानगरपालिकेतील विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांनी आपल्या विरोधी गट नेते पदाचा राजीनामा आमदार आसिफ सेठ – यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे महापालिकेत नवीन विरोधी गट नेत्याच्या निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू असून रियाज किल्लेदार, रवी साळुंखे आणि सुहेल संगोळी या तिघांची नावे सध्या आघाडीवर आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून मुज्जमिल डोणी काम पहात होते. खरे तर दरवर्षी सत्ताधारी आणि विरोध गटनेत्याची निवड केली जाते. मात्र वेगवेगळ्या कारणामुळे नगरसेवक मुज्जमिल डोणी यांना दोन वर्षाहून अधिक काळ विरोधी गट नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली अलीकडेच सत्ताधारी गटनेते गिरीश घोगडी यांच्यानंतर नुकतेच नूतन सत्ताधारी गट नेते म्हणून अॅड. हनुमंत कोंगाली यांची निवड
करण्यात आली आहे या निवडीनंतर विरोधी गटातदेखील गट नेत्यांच्या निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे विरोधी गट नेते मुज्जमिल डोणी यांनी नुकताच आमदार आसिफ सेठ यांच्याकडे गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर महापालिकेत नवीन विरोधी गट नेता कोण होणार? याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या विरोधी गटनेते पदासाठी नगरसेवक रियाज किल्लेदार, नगरसेवक रवी साळुंखे आणि नगरसेवक सुहेल संगोळी या तिघांची नावे चर्चेत आहेत
मनपा विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांचा राजीनामा
