आयपीएल चषक जिंकल्यानंतर आरसीबी क्रिकेट संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बंगळूर शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह डीसीपी, पीआय यांना निलंबित करण्यात आले आहे; तर आरसीबी संघ व्यवस्थापन, विजयोत्सव आयोजित करणाऱ्या डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डीकुन्हा यांचा एकसदस्यीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेंगराचेंगरीनंतर तातडीने पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्यांनी गुरुवारी रात्री तातडीची पत्रकार परिषद घेत वरील घोषणा केल्या. यासोबतच कब्बन पार्क पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती मायकल डीकुन्हा आयोगाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले
चेंगराचेंगरीचा ठपका पोलिस अधिकाऱ्यांवर
