पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चोर्ला घाटात काल पहाटे रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे, बेळगाव- चोर्ला महामार्गावरील रहदारी काही काळ विस्कळीत झाली होती. त्याच ठिकाणाजवळून सिमेंटची वाहतूक करणारा अवजड ट्रक दरीत कोसळला असून सुदैवानेच चालक बचावला आहे.
चोर्ला घाटात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरीपासून काही अंतरावर गोव्याच्या हद्दीत पहाटे पाचच्या सुमारास मोठी दरड कोसळली. रात्रीची वेळ असल्याने अनेक वाहनचालकांना या अडथळ्याचा अंदाज आला नाही. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला उताराला या अडथळ्याची कल्पना न आल्याने ट्रक
रस्त्यावर कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला चुकविताना थेट दरीत कोसळला. ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने तो बालंबाल बचावला