उदघाटनाला वाहतूक मंत्री ,पालकमंत्री ,आमदार यांची उपस्थिती
बेळगावातील आरटीओ कार्यालयाची नूतन इमारत जुन्या जागेतच उभारण्यात आली असून त्या नवीन इमारतीचे आणि कार्यालयाचे उद्घाटन वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार राजू सेट पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते .या इमारतीसाठी तब्बल ९ कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
यापूर्वीची इमारत फार जुनी होती. ती इमारत हटवून दुमजली इमारत उभा रण्यात आली असून इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.
आरटीओविभागाची एकूण १एकर ६ गुंठे जमीन आहे. त्यामधील जागेमध्ये ही इमारत उभी करण्यात आली आहे.. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व खासदार,
आमदार तसेच पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.