येथील एसपीएम रोडवरील विश्वकर्मा मंगल कार्यालयानजीक च्या कॉर्नर वर विकासकामे करण्याकरिता खोदाई करण्यात आली. मात्र खोदाई होऊन सुद्धा येथील खड्डा व्यवस्थित न बुजविल्याने या खड्डयात वाहन अडकल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी सकाळी कचरा वाहू गाडीचे मागील चाक खड्ड्यात रुतल्याचे निदर्शनास आले .येथील खड्ड्यात गाडीचे मागील चाक गेल्याने या मार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी झालेली दिसून आली.
विकास कामे राबविण्याकरिता करण्यात आलेली कामे व्यवस्थित पूर्णत्वास नेत नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी खोदाई करून खड्डे व्यवस्थित न बुजविण्याचे पाहायला मिळत आहे तर दुसर्या ठिकाणी अशा या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेआज सकाळी कचरा वाहून गाडी या खड्ड्यात अडकल्याने समस्या निर्माण झाली होती. त्यातच वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.