बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांचीजबलपूर येथे बदली करण्यात आली आहे. मागील दीड वर्षांपासून ते बेळगावमध्ये कॅन्टोन्मेंटचे सीईओ म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महसूल वाढीसंदर्भात उत्तम कार्य केले. संरक्षण मंत्रालयाकडून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमार यांचा समावेश आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये घडलेल्या मध्यंतरीच्या रुपाने कायमस्वरुपी सीईओ मिळाले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासात्मक व महसूलसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या बदलीचे आदेश मिळाले असून ते जबलपूर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ म्हणून काम करणार आहेत. सध्या डीईओ दिव्या शिवराम यांच्याकडे तात्पुरता पद्भार देण्यात आला आहे. त्यामुळे आता सीईओपदी कोणाची वर्णी लागणार, हे पाहावे लागणार आहे.
कॅन्टोन्मेंट सीईओंची यांची बदली
By Akshata Naik

Must read
Previous articleमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Next articleगांजा सेवन करणाऱ्या तरुणावर एफआयआर