महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून बेळगावच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी हद्दपार पारीची नोटीस बजावली होती, सदर नोटीसीची सुनावणी न्याय दंडाधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांच्या समोर आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी पार पडली, या सुनावणीसाठी न्याय दंडाधिकारी यांनी शुभम शेळके व माळमारुती पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांना हजर राहण्यास सांगितले होते, यावेळी शुभम शेळके यांनी आपले वकील महेश बिर्जे यांच्या मार्फत आपले म्हणणे मांडले तर सुनावणीसाठी माळमारुती पोलिस स्थानकाचे निरीक्षक हे अनुपस्थित राहील्याने सदर सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
यावेळी वकील वैभव कुट्रे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, समिती नेते महादेव पाटील, उपाध्यक्ष विजय जाधव, नारायण मुचंडिकर,अशोक घगवे, अभिषेक कारेकर, रिचर्ड अंथोनी,किरण मोदगेकर, आदी उपस्थित होते.