सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, बेळगावचा चिंतामणी गणाचारी गल्ली बेळगांव येथे नुकताच मुहूर्त मेढ कार्यक्रम पार पडला,
सालाबादाप्रमाणे सदर मंडळ सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ठेवली आहे, कोरोनाच्या काळात आरोग्य उत्सव म्हणजे 11 दिवस मोफत उपचार आयोजित केले होते, covid च्या दुसर्या लाट येताच मोफत रुग्णवाहिका सोबत ऑक्सिजन covid च्या रूग्णांना पुरवले आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आलेला हे मंडळ ह्या वर्षी एक आगळा वेगळाच उपक्रम मन भरवून जाणारा दृश्य पाहायला मिळाले,
नंदन मक्कळ धाम येथील अनाथ मुलांच्या हस्ते हे मंडप खांब पूजा करून त्या मुलांना एक वेगळा, अनुभव देण्यात आला त्या सर्व मुलांच्या चेहर्यावर जे आनंद होते होती तो आनंद पाहून गल्लीतील सर्व नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे मन भारावून गेले.त्या मुलांना लागणारे साहित्य सोबत त्यांचे जे जबाबदारी मंडळाचे कार्यकर्ते घेत ते सर्व मुल आपल्या गल्लीतल्या एक कुटुंब असल्याचे अणि त्यांच्या सर्व सुखात व दुःखात गल्लीतील सर्वजण असणार ह्याची ग्वाही देण्यात आली.
येणार्या गणेशोत्सव मध्ये सर्व मुलांना संपूर्ण बेळगाव परिसरातील गणरायाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचीही तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पाटील यांनी सांगितले .
नंदन मक्कळधाम मधील मुलांच्या हस्ते बेळगावचा चिंतामणी गणाचारी गल्लीचा मुहूर्तमेढ संपन्न
