दोन दिवसांपूर्वी मुसळधा पावसामुळे सुप्रसिद्ध सौंदत्ती यल्लमा मंदिरात व परिसरात पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. मंदिर प्रशासनाकडून स्वच्छतेचे काम हाती घेऊन, आता भक्तांसाठी यल्लमा देवीचे दर्शन सुरू करण्यात आले आहे.
पावसामुळे मंदिरातील दानपेटीत देखील पाणी घुसल्याने, आता पाऊस कमी झाल्यानंतर दानपेटी उघडून त्यातील पैशांच्या नोटा संपूर्णपणे भिजलेल्या आहेत.
त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या नोटा मंदिराच्या आवारात सुकविण्याचे काम केले जात आहे. काही नोटांना माती व हळद-कुंकू चिकटलेले आहे. ते स्वच्छ करून व्यवस्थितपणे सुकविण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे पुन्हा स्थानिक नागरिकांची व भक्तांचे गैरसोय होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेतली जाईल असे मंदिराचे प्रशासक अशोक दुडगुंट्टी यांनी सांगितले.