दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुदर्थीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. तब्बल 39 तासांनंतर गणपती विसर्जन मिरवणूक संपली.
बेळगावातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक हे मिरवणूक मार्गावर येतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली बेळगावची विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी देखील सुरू होती. तर शहराची विसर्जन मिरवणूक तब्बल 38 तासांपेक्षा अधिक चालली आणि सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास महानगरपालिकेची गणेशमूर्ती व बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्लीचा गणेश विसर्जन करून मिरवणूक संपली.याआधी राजहंस गल्लीचा राजा ,गणाचारी गल्लीचा चिंतामणी आणि पि के काटर्स या गणपतीची विसर्जन झाले
शनिवारी सायंकाळी पाच वाजता माजी आमदार अनिल बेनके महापौर मंगेश पवार पोलीस आयुक्त भूषण बोरसेसह आदींच्या उपस्थित आरती करून मानाच्या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली
विसर्जन मिरवणुकीला लागला वेळ: शहरात यंदाच्या वर्षी 125 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळं होती. शनिवारी मोठ्या उत्साहात वाजत गाजत बेळगावच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.
बेळगावात गणेश विसर्जन मिरवणुकीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तब्बल 38 तासानंतर बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुक संपली. बेळगावात पहिल्यांदाच असं घडलं आहे.