बेळगावातील बेंकनहळळी येथील घटना
-ग्रामस्थांनी अपघात घडल्यावर चालकाला पकडून केला रास्ता रोको
बेळगावातील बेनकनहळळी गावात शेतकऱ्याला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत सायकल स्वार शेतकरी जागीच ठार झाला आहे.
मल्लप्पा पाटील वय 70 या घटनेत ठार झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी ट्रकने शेतकऱ्याला चिरडल्यानंतर गावकर्यांनी ट्रक चालवायला पकडून ठेवून ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आंदोलन केले. या भागातून एफसी गोडाऊनच्या गाड्या रस्त्यावरून जात असल्याने वारंवार अपघात होत असतात आज या झालेल्या अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्या असल्याने या मार्गावरून गोडाऊनच्या गाड्या जाणे बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे