हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. कारागृहातील कैद्यांच्या आत्महत्येची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. कैद्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
बसवराज इराप्पा मगदूम (वय ३८) राहणार मंगसुळी, ता. कागवाड असे त्याचे नाव आहे. कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खून प्रकरणी त्याला शिक्षा झाली होती सोमवारी दुपारी बसवराजने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस येताच त्याला वाचविण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला
हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यल्लापूर, ता. हुक्केरी येथील लगमाण्णा सोमनिंग सनदी (वय ४४) या कैद्याने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर केवळ दहा दिवसांत आणखी एका कैद्याने आपले जीवन संपविले आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची आत्महत्या
