पोलिस आयुक्तालय व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारींची प्रकरणे यामधील तपास झालेली तसेच रखडलेली प्रकरणे कोणती. एखाद्या मोठ्या प्रकरणाचा तपास कशामुळे रखडलेला आहे, या सर्व बाबींचा आढावा, राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी घेतला.
डॉ. सलीम यांचे सोमवारी रात्री बेळगावात आगमन झाले. यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. सुभाषनगर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या समुदाय भवनच्या फलकाचे त्यांच्या हस्ते
अनावरण झाले. यानंतर त्यांनी पोलिस आयुक्तालय व जिल्हा पोलिस
समाजाच्या मुख्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करताना त्यांनी अधिवेशन काळात झालेल्या लिंगायत आंदोलनावेळीचा तपास कुठेपर्यंत आला आहे, याचा आढावा घेतला. बैठकीला उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंह राठोड, पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी एन. व्ही. बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आर. बी. बसरगी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस समुदाय भवनचे उद्घाटन



