फटाके तयार करीत असताना कारखान्यात स्फोट झाल्याने आगीत 6 जण सजीव दहन झाल्याचे दुर्दैवी घटना आंध्र प्रदेश राज्यातील आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात घडली आहे.
सदर फटाके तयार करण्याच्या कारखान्यात काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला, त्यामुळे संपूर्ण कारखाना पेटून आगीमुळे सहा जण होरपळून ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तातडीने जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.