पत्नीचा खून करून मृतदेह पलंगाच्या खाली ठेवून पलंग लपवून पती फरार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमलदिनी गावात उघडकीस आली आहे.
साक्षी कुंभार वय 20 असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती आकाश हा फरार झाला आहे.
चार महिन्यांपूर्वी आकाश व साक्षी कुंभार यांचा विवाह झाला आहे. चार दिवसांपूर्वी पत्नीचा खून करून पती आकाशने मृतदेह पलंगाच्या खाली लपवून ठेवला. त्यानंतर आपला मोबाईल स्विच ऑफ करून फरार झाला आहे.
परगावी गेलेली आकाशची आई घराकडे परत आल्यानंतरच दुर्गंधी आली. यावेळी खाटाकालील पेटी उघडून पाहिल्यानंतर मृतदेह आढळून आला.
याविषयी माहिती समजताच घटनास्थळी तहसीलदार श्रीशैल गुडमे व गोकाक डीवायएसपी रवी नायक यांनी भेट देऊन आरोपीचा शोध घेत आहेत.
हुंड्यासाठी आपल्या मुलीचा खून केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.