सेंट्रिंग काम करताना तोल जाऊन कोसळल्याने वृद्ध कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) उज्ज्वलनगरमध्ये घडली. नारायण विठ्ठल वांद्रे (वय ६५, रा. विजयनगर, हिंडलगा) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, नारायण वांद्रे नेहमीप्रमाणे सेंट्रिंग कामावर गेले होते. उज्ज्वलनगरमधील एका कामावर ते चढून सेंटिंग करत होते. यावेळी अचानक तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे