बेळगांव ः सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
प्रगतिशील लेखक संघातर्फे निषेध सभा
By Akshata Naik
Must read
Previous articleतोल जाऊन सेन्ट्रींग कामगारच मृत्यू