घरासमोर खेळणाऱ्या बालिकेला फरफटत नेऊन मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याची घटना गुरुवारी (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास मारुतीनगरमध्ये घडली. या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली असून तिचे डोके व तोंडाचे लचके कुत्र्याने तोडले आहेत. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आराध्या उमेश तेरगार (वय १ वर्ष ९ महिने) असे तिचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, आराध्या मारुतीनगरमधील आपल्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी अचानकपणे मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.