No menu items!
Monday, October 13, 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्या भव्य पथसंचलन

Must read

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगावच्यावतीने
विजयादशमीनिमित्त रविवार दि. १२ रोजी पथसंचलन करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वा. सरदार्स मैदान येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे.. शहरात पथसंचलनाचे दोन मार्ग करण्यात आले असून, त्याद्वारे पथसंचलन केले जाणार आहे. लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य पथसंचलन सोहळा होणार आहे. पहिल्या मार्गाला सायंकाळी ५ वा. सरदार्स मैदानापासून सुरुवात होणार असून, कॉलेज रोडमार्गे राणी चन्नम्मा चौक, जिल्हाधिकारी
ऑफिस कॉम्प्लेक्स, चव्हाट गल्ली, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, भडकल गल्ली, खडक गल्ली कॉर्नर, कचेरी रोड, शनिवार खुट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनी मंदिर, कुलकर्णी गल्ली ते टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, रामलिंग खिंड कॉलेज, डोंबिवली कॉलेज, डी. मैदान.
स्वयंसेवकांनी गणवेश घालून पथसंचलनामध्ये सह‌भागी व्हावे. तसेच नागरिकांनी रांगोळ्या, तोरण तसेच भगव्या ध्वजाचे पुष्पार्चन करून स्वागत करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!