हाता तोंडाला आलेल्या पिकाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील बीजगर्णी गावातील प्रगतशील शेतकरी रामलिंग हलकर्णी यांच्या शेतातील पिकाला आग लागल्याने उस आणि काजू या आगीत भक्षस्थानी पडले आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी याकरिता ग्रामस्थांच्यावतीने मदत करण्यात येत आहे
येथील शेतात लागलेल्या आगीत सोलार पावर पंप सेटचे देखील नुकसान झाले आहे. ही बातमी समजताच बीजेपी ग्रामीण माजी अध्यक्ष विनय विलास कदम मराठा एकता संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल जाधव मोनाप्पा भास्कळ सुभाष पाटील राजू तारीहाळकर यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर एपीएमसी सेक्रेटरी तहसीलदार आणि तलाठी यांना याबद्दल माहिती देऊन नुकसान भरपाई साठी मदत करण्याची मागणी केली.यावेळी सदर शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.