सर्व लोक सेवा फौंडेशन नावाप्रमाणेच आपल्या कार्याचा विस्तार करताना दिसून येत आहे.सर्व लोक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू ,पीडित,वृद्ध ,मुक्या प्राण्यांचा अंत्यसंस्कार सोबतच देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोक सेवेत आहे त्.यासोबतच आता यात आणखी भर पडली ती म्हणजे समाजातील निराधार ,निराश्रीत,मनोरुग्ण झालेल्या किंवा ठरलेल्या व्यक्तीच्या सेवेत रुजू झाल्याची.
येथील हिरेबागेवाडी येथून सर्व लोक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष श्री .विरेश बसय्या हिरेमठ यांना फोन आला .की सदरच्या ठिकाणी एक निराधार ,निराश्रीत ,मनोरुग्ण असलेली व्यक्ती अगदी दयनीय अवस्थेत आपले जीवन कंठत आहे,माणूसपणाच्या काही ,काही म्हणून सेवा संबंधित व्यक्तीला मिळत नाहीत,उकिरड्यावर राहणे ,त्यातुनच अन्न शोधून खाणे व तिथेच झोपणे असा प्रकार या व्यक्तीबाबत घडत होता .
याची माहिती नागरीकांनी सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष श्री.विरेश बसय्या हिरेमठ याना दिली त्यांनी लगेच संबंधित ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीची विचारपूस केली व तात्काळ बेळगावच्या निराधार ,निराश्रीत पुनर्वसन कार्यालयाशी संपर्क साधला व त्या गरजू मुलाकडे वैयक्तिक लक्ष घालून अधिकाऱ्यांशी चर्चा करून बेळगावला दाखल केले व जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे हे आपल्या कार्यातून सिद्ध केले.
हिरेबागेवाडी परिसरातून नागरिक सर्व लोक सेवा फौंडेशनचे मनोमन आभार मानत आहेत व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत .यावेळी श्री.सिद्धू हुक्केरी श्री.निळकंठ पार्वती,श्री.तमन्ना गणगी,श्री.आनंद पाटील उपस्थित होते.