No menu items!
Sunday, January 11, 2026

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदा खानोलकर हिला रौप्य पदक

Must read

नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लब ची जलतरणपटू व जी जी चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x 100 मीटर मिडले रिले मध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले. कुमारी वेदा हिला शाळेचे चेअरमन एडवोकेट चंद्रहास अनवेकर, प्रिन्सिपल नवीना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक धनाजी सर, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, हिंद चे अध्यक्ष श्री अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन तर एनआयएस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!