रेल्वेस्टेशन समोरील गोवा बसस्थानक आवारात अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या एका ८० वर्षीय अनोळखी वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने सोमवार दि. १५ रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात झाली असून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी एक ८० वर्षीय अनोळखी वृद्ध अत्यवस्थ
अवस्थेत पडला होता. त्यामुळे काहींनी त्याला सायंकाळी ६ च्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून दाखल केले. पण त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्याची उंची ५ फूट ४ इंच, पसरट चेहरा, लांब नाक, गव्हारी वर्ण, डोक्यावर १ इंच पांढरे केस आहेत. अंगावर निळ्या रंगाचा टीशर्ट असून वरील वर्णनातील मृतदेहाबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कॅम्प पोलीस स्थानक ०८३१-२४०५२३४ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



