१४ व्या एकांकिका स्पर्धेचा बक्षीस समारंभ अतिशय उत्साही वातावरणात पार पडला..सदर स्पर्धेच्या खुल्या गटांमध्ये DRKC कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर संघाच्या ग्वाही व शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हा मर्यादित गटामध्ये वरेरकर नाट्य संघ बेळगांव यांच्या झाले मोकळे आभाळ या एकांकिकेने बाजी मारली.
दिमाखदार बक्षीस सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हा चेअरमन शाम सुतार. व प्रमुख पाहुणे म्हणजन विद्यमान परीक्षक उपस्थित होते.या वेळी बोलताना परीक्षकांच्या वतीने श्री प्रमोद काळे यांनी वेळेप्रमाणे एकांकिकेमध्ये होत असलेले बदल व त्याबद्दल घ्यायची खबरदारी विषद करत असताना स्पर्धेमधील सहभागी संघांच्या सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले. स्पर्धेअंतर्ग संघांची चर्चा परीक्षण मंडळाबरोबर होणे अतिशय गरजेचे आहे.असे ही ते म्हणाले. याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर,शरद पाटील, भाग्यश्री जाधव ,लक्ष्मीकांत जाधव नंदा कांबळे सांस्कृतिक दालनाचे सुभाष सुंठणकर, निळूभाऊ नार्वेकर , कर्मचारी वर्ग ,पिग्मी कलेक्टर व नाट्य रसिक बहु संख्येने उपस्थित होते (टीप.स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे)
२ दिवस झालेल्या स्पर्धेला बेळगावातील बऱ्याच ज्येष्ठ रंगकर्मीनी भेट देऊन स्पर्धेची प्रशंसा केली.या वेळी बोलताना जेष्ठ रंगकर्मी प्रसाद पंडित यांनी कॅपिटल वन दालनाने स्पर्धेमध्ये ठेवलेल्या सातत्य व स्पर्धक संघांच्या दर्जेदार सादरीकरणाने प्रशंसा केली.
14 वे कॅपिटल वन करंडक कोल्हापूरच्या ‘ग्वाही’ एकांकिकेचे बेळगांव जिल्हा गटा मध्ये ‘ झाले मोकळे आभाळ ‘



